शनिवार, १९ मे, २०१८

बदलत्या काळाची गरज: ज्ञानरचनावाद,Activity Based Learning, Collaborative Learning व Digital School यांची सांगड



माझ्या दृष्टीकोनातील आदर्श शाळा
                                                                    --  श्री. शरद लक्ष्मण पांढरे


कवी केशवकुमार म्हणतात,
"ही आवडते मज मनापासुनी शाळा | लाविते लळा ही, जसा माउली बाळा ||
हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी | ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी |
हासुनी, हसवुनी, खेळुनी सांगुनी गोष्टी | आम्हांस आमुचे गुरूजन शिक्षण देती ||"

 माझ्या दृष्टीकोनातील आदर्श शाळा ही विद्यार्थ्यांना स्वअध्यायनास प्रेरणा देणारी असावी. जेथे विद्यार्थी हा अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले जावेत. कला, क्रीडा, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, तंत्रज्ञान, नेतृत्व राष्ट्रभक्ती तसेच सामाजिक गुणांचा विकास होण्यासाठी तसेच मूल्यशिक्षण मिळण्यासाठी उपक्रम राबविले जातात.
विद्यार्थ्यांमध्ये auditory, visual, तसेच kinesthetic learners  असतात व त्यांच्यामध्ये individual differences असतात याचे भान ठेवून अध्ययन अध्यापन प्रक्रिया कार्यान्वित केली जाते. तसेच मुलांमधील बहुबुद्धिमत्तेचा (Multiple intelligence) वापर देखील अध्ययन अध्यापन प्रक्रियेत व्हावा. प्रत्येक विद्यार्थ्यांचे एकमेव-द्वितीय व्यक्तिमत्व (Unique Personality) असते याच भान असणारी शाळा असेल. त्याचबरोबर समावेशक शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांचा बुद्धयांक, शारीरिक दोष (Physical disorder) यांची जाण प्रत्येक घटकाला आहे.
        विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करून कृतीयुक्त शिक्षणास वाव दिला जातो. तसेच अध्ययनात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांच्यासाठी विविध उपक्रमांचे उपचारात्मक अध्यापनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.
 जेथे अध्ययन अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा न्याय्य वापर करण्यात येतो. (Judicious use of Technology).  ज्ञानरचनावाद, डिजिटल स्कुल, ABL(Activity Based Learning), collaborative learning तसेच पारंपरिक पद्धतीने दिले जाणारे शिक्षण यांची सांगड घालून आनंददायी शिक्षण दिले जाते. भविष्याचा वेध घेऊन शिक्षण दिले जाते त्यासाठी नवनवीन तंत्रे आत्मसात केली जातात.
विद्यार्थ्यांना स्वअभिव्यक्तीस पुरेसा वाव दिला जातो.  विद्यार्थ्यांची जिज्ञासूवृत्ती जागृत करून त्यांना विविध प्रयोग, निरीक्षण, चर्चा, शोध घेण्यास पुरेसा वाव दिला जातो. कारण Curiosity is the mother of invention.
          जेथे विद्यार्थ्यांना आव्हाने (Challenges) दिली जातात. त्यातून मार्ग काढण्यासाठी ते अधिक प्रयत्न करतील व स्वतः सक्षम व जबाबदार होतील. त्याचबरोबर मुलांची संवेदनशीलता जोपासली जाते. आव्हानांमध्ये (Challenges) मध्ये संधी (opportunity) शोधणे वा निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली जाते.
      विद्यार्थ्यांच्या creativity ला पुरेसा वाव मिळायला हवा. नवनिर्मिती प्रक्रियेस चालना देणारे शिक्षण तेथे मिळायला हवे.
       समीक्षणात्मक विचार (critical thinking), नवनिर्मिती विचार (Creative Thinking), सहकार्यातून शिक्षण Collaborative learning, संभाषण कौशल्ये(Conversation skills), संप्रेषण कौशल्ये (communication skills) इ. 21व्या शतकातील कौशल्ये व विचार वृद्धिंगत होणारे शिक्षण दिले जाते.
       जीवन कौशल्यांचे शिक्षण, किशोरवयीन मुलांसाठीचे शिक्षण त्यांना शाळेतून मिळत असेल. तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षितता या गोष्टीला प्राधान्य देण्यात येते. जेथे विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक, भावनिक सुरक्षितता जोपासली जाते.
एक उत्तम माणूस व आदर्श नागरिक बनण्याचे धडे सहजपणे विद्यार्थ्यांना मिळतील. स्वयंशिस्त तसेच स्वच्छतेच्या सवयी विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवलेल्या असतील हे कटाक्षाने पाहिलं जातं.
       शाळेमधील वातावरण हे लोकशाही स्वरूपाचे असावे. प्रत्येक विद्यार्थ्याला मत मांडण्यास स्वातंत्र्य मिळावे. तसेच शिक्षकांना देखील त्यांचे मत मांडायला, त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना राबविण्यास स्वातंत्र्य हवे. त्यांचे वर्ग व पाठ निरीक्षण करून त्यांना प्रेरणादायी व constructive feedback द्यायला हवा. कुणालाही अपमानास्पद वागणूक मिळत नाही.
शिकण्यासाठी पोषक शालेय वातावरण (school ecosystem) निर्माण केले आहे.  मुलांना प्रसन्न वाटेल, त्यांना हवेहवेसे वाटेल असे शालेय वातावरण त्यांना मिळायला हवे.  त्यामध्ये सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा, ग्रंथालय, शालेय बागबगीचे, क्रीडांगण, व्यायामशाळा, डिजिटल classroom इ., पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था, शैक्षणिक साधने, उत्तम निवास व भोजनव्यवस्था असेल.
        जेथे उपलब्ध परिस्थितीतील, उपलब्ध साधनांचा अधिकाधिक वापर करून उत्तम शिक्षण दिले जाते. (Maximum utilization of the available resources.)
      उत्तम दर्जाचे, मूल समजून घेणारे, आईच्या मायेने त्यांना प्रेम देणारे, स्वतःला झोकून देऊन काम करणारे स्वयंप्रेरित  (Self motivated), स्वतःला नेहमी बदलत्या काळानुसार update करणारे शिक्षक, कर्मचारी व मुख्याध्यापक असायला हवे. प्रेरणादायी नेतृत्व मुख्याध्यापक आहेत.
            मला वाटतं शाळेत शिक्षकाला कोणती जात- धर्म - पंथ नसतो. शिक्षक हीच त्याची जात असते व तोच त्याचा धर्म. विद्यार्थी हेच त्याचे दैवत व शाळा हीच त्याचे प्रार्थनास्थळ! शिक्षक हा वैश्विक (Universal) असतो याचं भान व गुणवत्ता हा त्याचा ध्यास असतो याची जाण प्रत्येकाला असेल.
       शाळेच्या प्रत्येक नाविन्यपूर्ण उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग घेतात- जसे क्रीडांगण विकास, बागबगीचे निर्मिती, वृक्षारोपण, परसबाग, शालेय व परिसर स्वच्छता.  त्यांचा सहभाग घेतला जातो व त्यामुळे शाश्वत विकासासाठी (sustainable development) मदत होते.
        प्रत्येक बाबीसाठी केवळ शासनावर विसंबून न राहता सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सहभाग, त्याचबरोबर पालक व समाजाचा सहभाग घेतला जातो. तसेच विविध सामाजिक संस्थांसोबत जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले जातील. शक्य तेथे CSR च्या माध्यमातून मदत मिळवावी इ. कडे लक्ष दिले जाते.
       निसर्ग व पर्यावरण हे सर्वात मोठे गुरु आहेत म्हणून निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण मिळून पर्यावरण विषयक जागृती निर्माण होणारे शिक्षण हवे. वैज्ञानिक अभिरुची व दृष्टीकोन विकसित करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे.
       जेथे विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी हे विषय म्हणून न शिकवता भाषा म्हणून शिकवले जाते  व हे करतांना फक्त पाठयपुस्तक शिकवले म्हणजे झाले असे न करता पाठयपुस्तका व्यतिरिक्त मुलांनी इतर ठिकाणाहून देखील भाषा शिकण्याच्या संधी मिळतात जसे वृत्तपत्रे, दूरदर्शनच्या बातम्या, खेळांची कॉमेंटरी, चित्रपट इ. गरजेनुसार विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेचा देखील अध्यापन व अध्ययन प्रक्रियेत वापर केला जातो.
त्याचबरोबर शक्य झाल्यास इतर भाषा देखील शिकण्याच्या संधी उपलब्ध केल्या जातात. जेथे भाषा शिकण्याच्या नैसर्गिक पद्धती अवलंब केला जातो. ग्लोबल महत्व लक्षात घेऊन आपल्याच माध्यमातून इंग्रजी शिकण्यास पुरेसा वाव दिला जातो. परिसरातून शिकण्यास वाव दिला जातो.
           विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य वृद्धिंगत होण्यासाठी विविध उपक्रम जसे मुक्त ग्रंथालय इ., डिजिटल लायब्ररी उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांना शक्य झाल्यास अन्य शहरातील, राज्यातील किंवा देशांतील शाळांतील वर्गांशी जोडलेला आहे. म्हणजे इतर मुले अशी शिकतात हेही त्यांना कळण्यास मदत होते. त्याचबरोबर whatsapp video च्या माध्यमातून किंवा अन्य अँपचा वापर करून इतर तज्ज्ञ शिक्षक, वैज्ञानिक यांच्याशी थेट संवाद साधण्याच्या संधी मिळतात. शाळेत विविध कार्यशाळा, शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन यांचे नियमित आयोजन करण्यात येते.
       जेथे विद्यार्थ्यांना शाळेबाहेरचे जग अनुभवण्यास देण्यासाठी विविध शैक्षणिक सहली तसेच परिसर सहलींचे आयोजन केले जाते. स्व अनुभूती दिल्या जातात. शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्स, व्यक्तिमत्व विकास, स्वसंरक्षण तसेच व्यवसाय शिक्षण व इतर संधी देखील शाळेतून उपलब्ध होतात. त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
     विविध विषयांची सांगड घालून शिक्षण (Correlation with other subjects) देण्यात येते. जसे की विज्ञान, समाजशास्त्र व गणित शिकतांना भाषा देखील आपसूकपणे शिकतील. तसेच कला, कार्यानुभव, तसेच प्रयोगांचे सादरीकरण करतांना भाषिक अभिव्यक्तीस संधी दिल्या जातात.
       जी माणसाला माणसाप्रमाणे माणूस म्हणून जगायला शिकवणारी व माणुसकीचा मळा फुलवणारी,  अशी माझ्या दृष्टिकोनातील व स्वप्नातील शाळा आहे.
                                                 श्री. शरद लक्ष्मण पांढरे
माध्यमिक शिक्षक, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिवळी, ता. शहापूर, जि. ठाणे. 9270257902

     

५ टिप्पण्या:

  1. नमस्कार पांढरे सर आत्ताच आपला ब्लॉग वाचला अतिशय सविस्तर आणि स्पष्टपणे शिकण्याचा आणि शिकविण्याचा वेगवेगळ्या पद्धती त्याचबरोबर बालकांचे मानसशास्त्र ज्ञानरचनावाद यासारख्या वेगवेगळ्या आधुनिक पद्धतीचा आपण आपल्या दैनंदिन कामकाजामत केलेला वापर वाखाणण्याजोगा आहे. खरंतर अतिदुर्गम भागांमध्ये वेगवेगळ्या कौटुंबिक सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या मुलांसोबत आपण वेगवेगळ्या शैक्षणिक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जर आपल्या धमक असेल तर कुठल्याही प्रकारची तक्रार न करता आपण आपल्या कामाची पावती देऊ शकतो हे आपण सिद्ध केले आहे. आपण करत असलेल्या दैनंदिन कर्तव्या बरोबर आपण आधुनिकतेची साथ करत आहात. त्याचबरोबर नवीन नवीन उपक्रम मुलांसोबत राबवुन मुलांना अपडेट करत आहात .शासकीय आश्रम शाळा शेनवे या ठिकाणी आपण केलेले काम ,त्याचबरोबर अतिशय थोड्या कालावधीमध्ये शासकीय आश्रम शाळा पिवळी या ठिकाणी आपण आपल्या कामातून ठसा उमटवला आहे. खरोखर तुमच्यासारखे 4-5 शिक्षक प्रत्येक प्रकल्पात जर असतील तर शैक्षणिक दृष्ट्या शासकीय आश्रम शाळा एक नवी नवी आव्हाने सहजपणे पेलू शकतील यात शंका नाही आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद!
    आपल्या सुंदर अभिप्रायाबद्दल!��

    उत्तर द्याहटवा